रत्नागिरी-जेलरोड येथे गांजा सेवन करणाऱ्या तरुणाला अटक

रत्नागिरी : जेलरोड येथील बीएसएनएल ऑफिससमोरील गार्डनजवळ गांजा सेवन करणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवार 14 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. अरफान सलीम साखरकर (वय 22, रा.भाटये, रत्नागिरी ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार दीपराज पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी तो बीएसएनएल ऑफिससमोरील गार्डनजवळ गांजाचे सेवन करत होता. त्याच्याकडून 3 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण वीर करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button