
मुलीचे लग्न लावून दिले नाही म्हणून वृद्धाचा डोक्यात जात्याचा दगड मारून खून
साखरपा येथील राहणारे सुभाष काळोखे यांनी त्यांच्या मुलीचे लग्न दुसऱ्याची लावून दिले या रागाने आरोपी अभिजित पाटील याने त्यांच्या डोक्यात जात्याचा दगड मारून खून केल्याचा प्रकार घडला आहे
यातील सुभाष काळोखे हे साखरपा येथे आपल्या घरी एकटेच राहत होते त्यांच्या मुलीचे आपल्याशी लग्न व्हावे यासाठी आरोपी अभिजीत राहणार नाचणे रोड रत्नागिरी हा सतत तगादा लावत होता 2012 पासून आरोपी हा काळोखे यांना त्रास देत होता काळोखे यांनी आरोपी अभिजीत याच्यात एकदा कानाखाली ही मारली होती त्यातच काळोखे यांनी आपल्या मुलीचा विवाह दुसऱ्या मुलाबरोबर लावून दिला याचा राग अभिजीतला होता या रागातून त्याने सुभाष काळोखे यांच्या डोक्यात जात्याचा दगड मारून त्यांची हत्या केली त्यानंतर आरोपी अभिजित हा स्वतःहून रत्नागिरी पोलिसांच्या स्वाधीन झाला या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे
www.konkantoday.com