कोकण मार्गावरून धावणार्‍या एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्याचा रेल्वे प्रशासनाचा सपाटा

कोकण मार्गावरून धावणार्‍या एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्याचा रेल्वे प्रशासनाचा सपाटा सुरूच आहे. कोकण मार्गावरून धावणार्‍या आणखी ६ लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांतील डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. २२ ते २४ डब्यांच्या एक्प्रेस गाड्यांना किमान ४ डबे असावेत, अशी दक्षता रेल्वे प्रशासनाकडून घेतली जात आहे.तिरूवअनंतपुरम-वेरावल एक्प्रेसला यापूर्वी दोन जनरल डबे होते. सुधारीत रचनेनुसार आणखी २ जनरल डबे वाढवण्यात आले आहेत. एका थ्री टायर एसी व एका थ्री टायर एसी इकॉनॉमी डब्यांचे जनरल डब्यात रूपांतर करण्यात आले आहे. १९ डिसेंबरपासून हा बदल अंमलात येणार आहे.कोच्युवेली-श्रीगंगानगर एक्सप्रेसला ३ जनरल डबे होते. या गाडीच्या एका थ्री टायर एसी कोचचे रूपांतर जनरल डब्यात करण्यात आले असून ७ डिसेंबरपासून हा बदल होणार आहे. तिरूवअनंतपुरम हजरत निजामुद्दीन एक्प्रेसला २ जनरल डबे आहेत. या गाडीच्या एका थ्री टायर एसी व एका थ्री टायर एसी इकॉनॉमी अशा दोन डब्यांचे रूपांतर जनरल डब्यात करण्यात आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button