चिपळूण येथे साप चावल्याने मुलीचा मृत्यू
चिपळूण: भक्ष्याच्या मागे आलेल्या सापाने दंश केल्याने एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना चिपळूण येथे घडली आहे. या मुलीचं नाव सिद्धी चव्हाण असं असून ती अकरावीची विद्यार्थिनी होती.
चिपळूण तालुक्यातल्या घोणसरे गावात सिद्धीचं कुटुंब राहतं. गुरुवारी दुपारी सिद्धी आपल्या घरात गाढ झोपली होती. उंदराच्या मागावर असलेल्या सापाने सिद्धीच्या घरात शिरून तिला तीन वेळा दंश केला.
या घटनेनंतर सिद्धीला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात सिद्धीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.