शौर्यचक्र पुरस्कार विजेते – मधुसूदन सुर्वे यांची दापोलीत मुलाखत!!
कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान आयोजित युवा प्रेरणा कट्टा या कार्यक्रम मालिकेतील दुसरा कार्यक्रम दि.8 ऑक्टोबर 2022 शनिवार रोजी, दापोली मधील ए.जी.हायस्कुलच्या माधव कोकणे सभागृहात पार पडला!
या कट्ट्यावर पाहुणे म्हणून, शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानित वीरयोद्धा – मुधुसूदन सुर्वे जी उपस्थित होते!
सुर्वे मूळचे शिवतर(ता.खेड) येथील असून भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेस चा अनेक वर्षे भाग होते!
या दरम्यान त्यांनी भारताने पाकिस्तान विरोधात केलेल्या अनेक ऑपरेशन्स मध्ये सहभाग घेतला आहे! ऑपरेशन हिफाजत 2(मणिपूर) येथील ऑपरेशन चे नेतृत्व करत असताना त्यांना शरीरावर 11 गोळ्या झेलाव्या लागल्या,तरीदेखील त्यांनी 37 आतंकवाद्यांना कंठस्नान घालत ते मिशन यशस्वी केले.यासाठी त्यांना तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते शौर्य चक्र पुरस्कार प्राप्त झाला.*
त्यांच्या युद्धाच्या आणि लष्करातील संघर्षमय प्रवासाच्या कथा ऐकताना सर्वच श्रोते मंत्रमुग्ध आणि भावुक झाले होते!
प्रतिष्ठानच्या वतीने मुलाखत घेण्याचे काम- उपाध्यक्ष मिहीर महाजन, संपदा माने, ऋजुता जोशी यांनी केले!
सुर्वे यांनी विविध प्रश्नांची उत्तरे देताना, युवक अधिकाधिक संख्येने सैन्यात भरती होत देशसेवा करतील अशी अपेक्षा दापोलीतील युवाशक्ती कडून केली. तसेच, कलम 370 बाबत सरकारचे आभार मानत, त्या निर्णयामुळे सैन्याला सीमासंरक्षणात अधिकच बळ मिळाल्याचे सांगितले.
सर्वच युवा प्रेरणा कट्ट्याच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी झाला तसेच मोठ्या संख्येने दापोलिकरांनी कार्यक्रमास हजेरी लावत सुर्वे यांच्या कर्तृत्वाला सलाम केला आणि कार्यक्रमाची सांगता झाली!