
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाची सुरक्षाच अडचणीत ,सुरक्षिततेसाठी असलेली कम्पाऊंड फोडून बांधकाम
रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या आवार सुरक्षित राहावे म्हणून आधीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे बांधण्यात आलेले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील कम्पाऊंडची भिंत पाडून तेथे गेट बनवण्याचे काम सुरू आहे मात्र हे काम करण्यास कोणाची परवानगी घेण्यात आली व याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे की नाही हे स्पष्ट होणे गरजेचे आहे मागील जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार सुरक्षित व स्वच्छ व सुशोभित करण्याच्या दृष्टीने अनेक प्रयत्न केले होते त्याचाच एक भाग म्हणून या संपुर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराला पूर्वी नसलेले मोठ्या उंचीचे कम्पाउंड बांधण्यात आले होते त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करायचा असेल तर मुख्य प्रवेशद्वारातून करणे आवश्यक होते अनेकवेळा जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मोर्चे येत असतात त्यावेळी मोर्चेकऱ्यांना नियंत्रित करण्यासाठी त्यांना एकाच गेटवर वरुन प्रवेश देण्याच्या दृष्टीने संरक्षण भिंत बांधण्यात आली होती त्यामुळे कोणीही मुख्य गेट शिवाय जिल्हाधिकार्यालयात प्रवेश करू शकत नव्हता मात्र गेल्या दोन दिवसांत भूमी लेखा कार्यालयाजवळील संरक्षण भिंतीचा भाग अज्ञाताने तोडून तेथे प्रवेश करण्यासाठी वाट बनवण्याचे बेकायदेशीर काम सुरू आहे काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील ग्राहकमंचाच्या कार्यालयाच्या खिडक्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या अशाप्रकारे आपल्या सोयीसाठी संरक्षण भिंती कोसळून वाटा निर्माण केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाची सुरक्षाच धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे
www.konkantoday.com