
रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारी नौकांसह मासळीचे उत्पादनही गतवर्षी कमी*
*_रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारी नौकांसह मासळीचे उत्पादनही गतवर्षी कमी झाले आहे. सन २०२१-२२ च्या तुलनेत गेल्यावर्षी २०२२-२३ मध्ये ४१६ मच्छीमार नौका कमी झाल्या. त्याचवेळी मासळीचे उत्पादनही ३८,५११ मेट्रिक टनांनी कमी झाले आहे.मासळीची घटती उत्पादकता आणि नौकांची कमी हाेणारी संख्या यामुळे मासेमारी व्यवसायाला आता घरघर लागली आहे.जिल्ह्यात मासेमारी उद्योग महत्त्वाचा मानला जात असला तरी गेल्यावर्षी मासेमारी उद्योगातील नौकांचे प्रमाण कमी झाल्याचे समाेर आले आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक करून अपेक्षित मासळीचा ‘रिपोर्ट’ मिळत नसल्याने मासेमारी नौका विकण्याकडे कल वाढला आहे.मासेमारीच्या हंगामात अनेक नैसर्गिक संकटांमुळे मासेमारीचे दिवस वाया जात असल्याने आर्थिक ताेटा सहन करावा लागत आहे.www.konkantoday.com