फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या तर्फे महिलांसाठी मॅमोग्राफी शिबिराचे नियोजन
मुकुल माधव फौंडेशन आणि फिनोलेक्स कंपनी आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, स्वच्छता आणि समुदाय विकास या क्षेत्रात कार्यरत आहेत.या नवरात्रीच्या निमित्ताने महिला सबलीकरणच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभ दिवशी वालावलकर रुग्णालयात संकल्प २०२२ मॅमोग्राफी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरांचा प्रवास 2014 मध्ये परकार हॉस्पिटल, रत्नागिरी येथे सुरू झाला. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि नवरात्रीच्या सणाची संधी घेऊन ही शिबिरे वर्षातून दोनदा आयोजित केली जात आहेत. रत्नागिरीची भोगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन उत्तरेकडील तालुक्यांसाठी 2019 पासून वालावलकर हॉस्पिटलच्या सहकार्याने ही शिबिरे चालू करण्यात आली. आजपर्यंत अशी 14 शिबिरे यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली असून हे 15 वे शिबिर आहे. या शिबिरांचे विषेश म्हणजे केवळ या शिबिरांचे आयोजन करत नाही तर शिबिरानंतर पाठपुरावा देखील केला जातो. या शिबिरांचा आजपर्यंत ४४६३ महिलांनी लाभ घेतला आहे.
दि . ११ ऑक्टोबर 2022 रोजी श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालक श्रीमती. यशवंतराव यांच्या हस्ते संकल्प 2022 चे उद्घाटन झाले. डॉ सुवर्णा पाटील, वैद्यकीय संचालक वालावलकर हॉस्पिटल, डॉ ज्योती यादव THO चिपळूण, श्रीमती. मोहिते शिक्षणाधिकारी चिपळूण , डॉ. नेताजी पाटील एचओडी रेडिओलॉजी, डॉ. भोसले एचओडी स्त्रीरोग, फिनोलेक्सचे प्रतिनिधी, लाभार्थी आणि इतर कर्मचारी देखील उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित होते. श्रीमती यशवंतरावांनी महिलांच्या आरोग्याच्या उन्नतीसाठी अथक प्रयत्नांची प्रशंसा केली. या शिबिराचा केंद्रबिंदू शिक्षण विभाग असल्याने श्रीमती मोहिते यांना खूप आनंद झाला. त्यांनी पुढे सांगितले की, या उपक्रमामुळे शिक्षक आणि इतर कर्मचार्यांच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता समाजाच्या दुर्गम भागापर्यंत पोहोचविण्यात मदत होईल.
वालावलकर हॉस्पिटलसोबतचा हा संयुक्त उपक्रम सुरू ठेवल्याबद्दल डॉ. सुवर्णा पाटील आणि डॉ. नेताजी पाटील यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनचे आभार मानले.या शिबिराचे आयोजन करून लाभार्थी महिलांना खूप आनंद झाला आणि सर्व महत्त्वाच्या चाचण्या फक्त १०० रुपयात केल्या जात असून पाठपुरावा सुविधाही एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या आहेत.शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.