
एसटी कर्मचार्यांचे 12 दिवसांचे कापलेले वेतन परत मिळणार
रत्नागिरी : एसटी कर्मचार्यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. महामंडळाच्या कर्मचार्यांनी वाढीव वेतनासाठी 2018 मध्ये संप पुकारला होता. तेव्हा महामंडळाने 16 दिवसांची कर्मचार्यांची वेतन कपात केली होती. या विरोधात कर्मचारी न्यायालयात गेले होते. न्यायालयाने केवळ चार दिवसांचे वेतन रद्द करण्याचे आदेश देत 12 दिवसांचे कापलेले वेतन परत देण्याची सूचना केली आहे. 65 टक्के कर्मचार्यांना ही एक प्रकारेे दिवाळीपूर्वीची भेटच मानली जात आहे. रत्नागिरी विभागात नऊ आगार असून, महामंडळाच्या कर्मचार्यांनी 8 व 9 जून 2018 रोजी वाढीव वेतनासाठी संप पुकारला होता. तेव्हा महामंडळाने संपात सहभागी कर्मचार्यांवर कारवाई करताना 16 दिवसांची वेतन कपात केली होती. एस. टी. कर्मचार्यांचे वेतन आधीच तुटपुंजे आहे, त्यातच 16 दिवसांची वेतन कपात केली तर कर्मचार्यांनी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. कर्मचार्यांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला असून, केवळ चार दिवसांचे वेतन रद्द करत 12 दिवसांचे वेतन परत देण्याची सूचना केली आहे