टपाल खात्याच्या विविध योजनांच्या माहितीसाठी कॅम्पचे आयोजन

लहानांपासून थोरांपर्यंत अनेक उपयुक्त योजना

सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन

रत्नागिरी / प्रतिनिधी

भारतीय टपाल विभागा मार्फत राष्ट्रीय टपाल सप्ताहाच्या निमित्ताने मालगुंड पंचक्रोशी मधील नागरिकांसाठी आधार शिबिर तसेच टपाल खात्याच्या विविध योजनांच्या माहिती साठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर कविवर्य केशव सुत स्मारक मालगुंड येथे दिनांक 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

या शिबिराच्या निमित्ताने पोस्ट ऑफिस मधील विविध योजनांची माहिती लोकांपर्यत पोहचवण्यात येणार आहे. तसेच आपल्या मुलांना त्यांच्या नावे एखादे बचत खाते उघडून, त्यांना सुद्धा बचतीची सवय लहान वयातच लावण्यासाठी सर्वांना ही सुवर्णसंधी भारतीय टपाल विभागाने उपलब्ध करून दिली आहे.

या शिबिराच्या माध्यमातून या योजना पाहता आणि लाभ घेता येईल.
▪️पोस्ट ऑफिस बँक अकाऊंट (POSA)*
Mimium Balance
Rs.500/- only.
Cheque Book फॅसिलिटी.
SMS फॅसिलिटी.
ATM कार्ड फॅसिलिटी.
Internet बॅंकिंग फॅसिलिटी
Mobile बॅंकिंग फॅसिलिटी

सर्व प्रकारच्या ऑनलाईन पेमेंट फॅसिलिटी उपलब्ध.

▪️सुकन्या समृद्धी योजना (SSA) : मुदत 21 वर्षे, सध्याचा व्याजदर 7.6%pa. मुलींच्या उच्च शिक्षण, लग्नकार्य तसेच उज्ज्वल भविष्यासाठी सर्वात फायदेशीर आणि अधिक व्याज देणारी योजना (वय वर्षे 0 ते 10 आत असलेल्या मुलींसाठी फक्त).

▪️Recurring Deposit (RD) Account -मुदत 5 वर्ष, व्याज दर 5.8%. दरमहा ठराविक रक्कम जमा करता येणारी करणारी आणि छोट्या कालावधीसाठी अतिशय सुंदर योजना. आपण आपल्या घरातील सर्व मेंबरच्या नावे सुध्दा ही योजना घेवू शकतो.

▪️ National Saving Certificates (NSC) – मुदत 5 वर्षे, सध्याचा व्याजदर 6.8%*

▪️Fixed deposit आणि इन्कम टॅक्स rebates साठी उत्तम गुंतवणूक.

▪️किसान विकास पत्र (KVP) – मुदत 10 वर्ष आणि 3 महिने. सध्याचा व्याजदर 7% ही एक दाम दुप्पट योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

▪️पब्लिक प्रोव्हिडंड फंड (PPF) : मुदत 15 वर्षे, सध्याचा व्याजदर 7.1%pa. चक्रवाढ पद्धतीने व्याजावर व्याज मिळणारी तसेच इन्कम टॅक्स मध्ये सुट मिळणारी आणि विशेष करून मुदतीअंती सर्व रक्कम टॅक्स फ्री देणारी, Corporate sector मधील ऑफिसर आणि स्टाफ यांना आवडणारी अतिशय सुंदर योजना.

▪️ Time Deposit (TD) – मुदत 1 वर्षे 5.5%
2 वर्षे 5.7%
3 वर्षे 5.8%
5 वर्षे 6.7%

▪️ Monthly Income Scheme (MIS) – मुदत 5 वर्षे, सध्याचा व्याजदर 6.7%pa खास करून निवृत्ती झालेल्या नागरिकांसाठी ही योजना अतिशय भरवशाची आहे. प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम हमखास मिळणारी योजना आहे.

▪️ Senior Citizens Saving Scheme (SCSS) – मुदत 5 वर्षे., सध्याचा व्याजदर 7.6%pa. 60 वर्षानंतर, तसेच 58 वर्ष निवृत्तीनंतर किंवा 55 वर्षा नंतर VRS घेतलेल्या नागरिकांसाठी अतिशय फायदेशीर, सुरक्षित आणि टेन्शन फ्री योजना आहे.

▪️ सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत.. अटल पेंशन योजना (APY). हमखास पेंशन देणारी सरकारी योजना. 18 ते 40 वय असलेले, भारतीय नागरिक सदर योजनेचा लाभ घेवू शकतात. स्वतःला, नंतर आपल्या जोडीदाराला आयुष्यभर पेंशन मिळणारी योजना.*

▪️प्रधान मंत्री जिवन ज्योती विमा योजना. (PMJJBY).- वय 18 ते 50. प्रीमियम वार्षिक 330 रुपये फक्त. जर नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला 2 लाख हमखास मिळणारी योजना आहे.

▪️प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)- वय 18 ते 70. वार्षिक 12 रुपये प्रीमियम आहे. जर एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला 2 लाख रुपये हमखास मिळणारी योजना आहे.

अशा अनेक योजना नागरिकांसाठी आहेत. या योजनांचा लाभ घेऊन आपले जीवन, आयुष्य सुखकर करावे असेही आवाहन श्री एन. टी. कुरळपकर डाकघर अधिक्षक रत्नागिरी विभाग यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button