जिल्हास्तरीय ज्युनियर तिरंदाजी स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी : 17 व्या जिल्हास्तरीय ज्युनियर तिरंदाजी स्पर्धेचे आयोजन रत्नागिरी जिल्हा तिरंदाजी असोसिएशनने श्री छत्रपती शिवाजी स्टेडीयम, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे दि. 14 ऑक्टोबर रोजी केले आहे. या तिरंदाजी स्पर्धा इंडियन, कंपाऊंड व रिकर्व्ह या तीन प्रकारात होणार आहे. या स्पर्धेतून प्रत्येक प्रकारातून पहिल्या सहाजणांची निवड 19 व्या राज्य ज्युनियर तिरंदाजी स्पर्धेसाठी होणार आहे. ही स्पर्धा गोंदिया येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडू दि.1 जानेवारी 2002 नंतर जन्मलेला असावा. इच्छुक खेळाडूंनी 2 फोटो, वयाचा मूळ दाखला व स्वतःचे धनुर्विद्येचे साहित्य आणावयाचे आहे. खेळाडूचे रजिस्ट्रेशन असणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्य पंच समिधा झोरे यांनी केले आहे.