
जाकादेवी येथे हॉटेलमागे जुगार चालवणार्या विरोधात गुन्हा
रत्नागिरी : जाकादेवी येथे हॉटेलच्या मागे जुगार चालवणार्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश प्रकाश कारकर (वय 31, राहणार करबुडे मोहितेवाडी, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण 4 हजार 755 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवार 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विनोद कदम यांनी तक्रार दिली होती. याचा अधिक तपास पोलिस हवालदार शिवगण करत आहेत.