गवत मारण्याचे औषध प्यायल्याने वेळवंड-कोंडवाडी येथील वृद्धेचा मृत्यू
रत्नागिरी : गवत मारण्याचे औषध प्यायलेल्या वेळवंड-कोंडवाडी येथील वृद्धेचा उपचारांदरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना रविवार 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वा. सुमारास घडली. इंदिरा लक्ष्मण धुमाळी (वय 75 ) असे तिचे नाव आहे. रविवारी सकाळी उलट्या करत असताना त्या त्यांच्या नातेवाईकांना दिसून आल्या. त्यांच्या हातात गवत मारण्याचे औषधही होते. नातेवाईकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.