
शिक्षणासाठी परदेशात जाण्याच्या तयारीत असलेल्या मुलीची घरात गळफास लावून आत्महत्या
एमबीबीएस शिक्षणासाठी परदेशात जाण्याच्या तयारीत असलेल्या तरुणीने घरात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी येथे घडला आहे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव सायली शशिकांत कांबळे वय २० असे आहे
सायली हिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते ती एमबीबीएस शिक्षणाकरिता जॉर्जिया देशात जाणार होती कोल्हापूर येथील विश्व या संस्थेकडून शिक्षणाकरता लागणारी कागदपत्रे प्राप्त करून घेऊन व्हिसा मिळवण्यासाठी वरळी येथे वडिलांबरोबर व्हिसा ऑफिसला जाऊन खालगाव येथे परतली होती
सायलीचे वडील सकाळी आठ वाजता तळमजल्यावर झेरॉक्स काम करीत असताना काहीतरी काम असल्याने ते घराच्या वरच्या मजल्यावर आले असता सायली हिने घरातील बेडरूममधील पंख्याला गळफास लावल्याचे आढळून आले तिला खाली उतरुन तात्काळ खासगी डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेण्यात आले त्यांनी तिला मृत घोषित केले सायली हिचे आत्महत्येचे कारण कळलेले नाही
www.konkantoday.com