रत्नागिरी बसस्थानकाचे काम काही दिवसांतच होणार सुरू : ना. उदय सामंत

रत्नागिरी : कोरोनानंतर बाजारातील साहित्याच्या किमती वाढल्यामुळे रत्नागिरीच्या मुख्य बसस्थानकाचे काम करण्यास ठेकेदाराकडून नाराजी दर्शवली जात होती. ठेकेदाराने मागितलेली वाढीव 7 कोटींची रक्कम शासनाने मंजूर केली आहे. त्यामुळे सुमारे 10 कोटींचे काम सतरा ते अठरा कोटींवर गेले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांतच हे काम सुरू होईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरी दौर्‍यावर असताना मंत्री सामंत यांनी बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाला भेट दिली. याबाबतची वस्तुस्थिती ना. सामंत यांनी जाणून घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button