आगामी निवडणुकांसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

चिपळूण : केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने जनतेच्या हितासाठी घेतलेले निर्णय तळागाळापर्यंत पोहोचवा, असा सल्ला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देताना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिपळुणातील संघटनात्मक आढावा बैठकीत केले. हॉटेल अभिरुचीमध्ये आयोजित भाजपच्या चिपळूण-गुहागर तालुक्याचा आढावा घेण्यात आला.
यावेळी भाजपा चिपळूण शहराध्यक्ष आशिष खातू यांच्यासह गुहागरमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ना. चव्हाण यांचे स्वागत केले. नंतर या सर्वांची  शासन स्तरावरील विविध निवेदने ना. चव्हाण यांनी स्वीकारली.
यावेळी ना. चव्हाण यांनी  भाजपच्या संघटनात्मक वाढीसाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांकडून काय अपेक्षित आहे, या संदर्भात मार्गदर्शन केले. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने शंभर दिवसात घेतलेल्या विविध विकासात्मक निर्णयांचे विवेचन केले. यावर्षी दिवाळीसाठी रेशन कार्ड धारकांना अन्न व नागरी पुरवठा विभागांंतर्गत शंभर रुपयांमध्ये अत्यल्प किमतीत दिवाळी जिन्नस किट देण्यात येणार आहे.
या योजनेची माहिती  ना. चव्हाण यांनी दिली.  यावेळी व्यासपीठावर  उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व माजी आ. डॉ. विनय नातू, जिल्हा सरचिटणीस रामदास राणे,माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, चिपळूण तालुका अध्यक्ष वसंत ताम्हणकर, चिपळूण शहर अध्यक्ष आशिष खातू , खेड तालुका अध्यक्ष किशोर आंब्रे, नीलेश सुर्वे, संतोष मालप आदी उपस्थिती होते.  या बैठकीचे सूत्रसंचालन रामदास राणे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button