
राजापुरातील महिलांचे ढोलपथक लक्षवेधी
राजापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे येथील श्री. सिद्धीविनायक नवरात्र उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ढोल वादन स्पर्धेत राजापूर महिला ढोल पथकाने सहभागी होत ठसा उमटविला.या पथकातील पूजा व अदिती या कुर्ले भगिनींनी स्पर्धकांच्या ढोल वादनाच्या चाली बसविल्या. पूजा व सोनल कुर्ले, गीता व किरण टिळेकर, ऋतिका खांबल, श्रेया शिंदे, सानिका वालेकर आणि रेश्मा भोगटे यांनी ढोलवादन केले. ऋतिक व प्रशांत रहाटे यांनी साथ दिली. मानसी खांबल, प्रिया कदम यांचेही सहकार्य लाभले. प्रेक्षकांनीही टाळ्या, शिट्ट्यांच्या गजरात पथकावर बक्षिसांचा वर्षाव केला.