रत्नागिरी आकाशवाणी केंद्र परिसरात तीन दुचाकी आगीत जळाल्या
रत्नागिरी : शहरातील थिबापॅलेस येथील आकाशवाणी केंद्रात शुक्रवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे तीन दुचाकी जळाल्याची घटना घडली. यामध्ये हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना मध्यरात्री साडेतीन ते पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडली. याची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांकडे करण्यात आली आहे. आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रमाधिकारी नंदादीपक बट्टा यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास आकाशवाणी केंद्राच्या पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या होंडा शाईन व दोन अॅक्टिव्हा गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या पार्किंगवरुन जाणार्या इलेक्ट्रीक वायरही जळून गेलेल्या होत्या.