रत्नदुर्ग माउंटेनिअर्स संस्थेच्या नूतन कार्यालयाचे ना. सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी
मागील अनेक वर्ष साहस आणि सामजिक उपक्रमात सहभागी होणाऱ्या रत्नदुर्ग माउंटेनिअर्स संस्थेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.

साहस व समाज उपयोगी कार्यक्रम राबवणाऱ्या या संस्थेचे कार्यालयाल शिवाजी स्टेडियम येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत उपस्थित होते. ना. सामंत यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यांच्यासमवेत रनप मुख्याधिकारी श्री. बाबर, माजी नगराध्यक्ष राहुलजी पंडित, माजी नगरसेवक राजन शेटे, माजी नगरसेवक दत्तात्रय साळवी, माजी नगरसेवक निमेशजी नायर, शहर प्रमुख बिपिन बंदकर, माननीय आर्किटेक संतोष तावडे, चेअरमन पर्यटन समिती पेडणेकर आदी उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी टीम रत्नदुर्ग माउंटेनअर्स तर्फे ना. मंत्री उदयजी सामंत यांचा सत्कार करण्यात आला. टीम रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे अध्यक्ष श्री वीरेंद्र वणजू यांनी आपल्या मनोगतात कार्यालयासाठी व साहसी प्रशिक्षण साहित्यासाठी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केल्याबद्दल साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले.
ना. उदयजी सामंत यांनी आपल्या भाषणामध्ये रत्नदुर्ग टीमचे भरभरून कौतुक केले. चिपळूण मधील महापुराच्या वेळी रत्नदुर्गने डोळ्यासमोर केलेल्या साहसी बचाव कार्याचा आवर्जून उल्लेख यावेळी ना. सामंत यांनी केला. अनेकवेळा आपत्तीच्या वेळी आपदग्रस्त ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवताना वाहनाची अडचण येते. ही अडचण लवकरच दूर करण्यात येईल असे ना. सामंत म्हणाले. रत्नदुर्ग माउंटेनिअर्सच्या दलात लवकरच रेस्क्यु सामानाची वाहतूक करण्यासाठी वाहन उपलब्ध करून देण्यात येऊन अशी ग्वाही ना. सामंत यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाकरिता टीम रत्नदुर्गचे १९९४ पासूनचे सर्व टीममेंबर हजर होते. तसेच कार्यक्रमाकरिता रत्नागिरी क्रीडाई अध्यक्ष नित्यानंद भुते, दीपक साळवी, महेश गुंदेजा, रत्नागिरी खबरदार चे संपादक श्री हेमंत वणजू, व अनेक शुभचिंतक उपस्थित होते.

राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे टीम रत्नदुर्ग माउंटेन असे 27 वर्षापासून चे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. त्याबद्दल सर्व रत्नदुर्ग ग्रुपच्या सदस्यांनी राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांचे भरभरून कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button