
परतीच्या पावसाने भातपीक धोक्यात
रत्नागिरी : परतीच्या पावसाने जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला झोडपून काढले. या पावसामुळे जिल्ह्यातील भातपिक धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जोरदार पावसामुळे काही भागात भातकापणीला आलेली भातपिके आडवी झाल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात गेले चार-पाच दिवस जोरदार पाऊस झाला. त्यानंतर गुरूवारी आणि शुक्रवारी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह परतीचा पाऊस सुरू झाला. रत्नागिरी, राजापूर, दापोली आणि गुहागर या किनिारी तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. लांजा तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. चिपळण तालुक्यातील काही गावांना पावसाने झोडपले.