गोळप येथे ड्रोनद्वारे पीक संरक्षण फवारणी प्रात्यक्षिक

रत्नागिरी : गोळप येथील प्रगतिशील शेतकरी प्रकाश साळवी आणि रफिक मुकादम यांच्या प्रक्षेत्रावर ड्रोनद्वारे पीक संरक्षण फवारणी प्रात्यक्षिक घेण्यात आले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व माउली ग्रीन आर्मी महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती बारामती तसेच रत्नागिरी कृषी विभाग यांच्या विद्यमाने हे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
यावेळी ड्रोनविषयी परिपूर्ण माहिती, ड्रोनमुळे मजूर व कीटकनाशके, बुरशीनाशकांची होणारी बचत याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुर्‍हाडे, उपविभागीय कृषी अधिकारी नाईकनवरे, तालुका कृषी अधिकारी भोये, कृषी अधिकारी माधव बापट, नारळ संशोधन केंद्र भाट्येचे कृषी विद्यावेत्ता श्री. मेहेर, महाराष्ट्र राज्य पर्यावरण समितीचे बाळासाहेब सानप व टीम, तसेच कृषी विभाग रत्नागिरीचे सर्व अधिकारी व कर्मचारी, पावस पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.
बाळासाहेब सानप यांनी ड्रोनद्वारे केल्या जाणार्‍या फवारणीबाबत मार्गदर्शन केले. भविष्यात ड्रोनद्वारे पिक संरक्षण, औषध फवारणी, आंबा बागायतदारांना  कशा तर्‍हेने फायदेशीर आहे, याची माहिती दिली. या परिसरातील हा पहिलाच प्रयोग असल्याने बागायतदार यांनी समाधान व्यक्त केले. अशीच प्रशिक्षणे राबवावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button