
वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव हल्ला प्रकरणी बदलापूर येथून एकाला ताब्यात.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ ×अण्णा जाधव यांच्यावर गुहागर तालुक्यातील नरवण येथे धारधार चाकूच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली होती. या हल्ल्याप्रकरणी गुहागर पोलिसांनी मुंबई बदलापूर येथून गुन्हे अन्वेषण शाखेकडून फरार असलेल्या संदीप पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.गुहागर तालुक्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय चुरशीची ठरली होती. अशी मध्येच हल्ला करण्याची पहिलीच घटना तालुक्यात घडली होती. विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याने या निवडणुकीला गालबोट लागले होते.www.konkantoday.com