
कोकण किनारपट्टीवर पावसाचा ग्रीन अलर्ट
रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर 8 ते 10 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये पालघर, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यात 8 ऑक्टोबरला ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे तर रायगडमध्ये पुढील तीन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी करताना पावसाचा मुक्काम राहण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 9 आणि 10 ऑक्टोबरला ‘ग्रीन अलर्ट’ राहणार असून पावसाचे सातत्य राहणार असल्याचा अंदाज आहे. ठाणे आणि मुंबईतही पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करताना या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सिंधदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवस ‘ग्रीन अलर्ट’ राहणार आहे.