इटली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये निसर्गयात्री संस्था व दृश्यम कम्युनिकेशन्स निर्मित ‘कोकणातील कातळशिल्प’ या शॉर्ट फिल्मची निवड
दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात इटली येथे “फेस्टिवल डेला कम्युनिक्याझिओन ई डेल सिनेमा ओर्कीओलॉजीको” हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिल्म फेस्टिवल आयोजित केला जातो. ऑक्टोबर 2022 मध्ये साजरा केल्या जाणाऱ्या या फिल्म फेस्टिवलमध्ये कोकणातील कातळशिल्प विषयावर आधारित शॉर्ट फिल्मची निवड करण्यात आली आहे. पुरातत्व शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा फेस्टिव्हल आहे. जगभरातील इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र विषयातील तज्ज्ञ मंडळींची उपस्थिती याला लाभणार आहे.
या शॉर्ट फिल्मची निर्मिती रत्नागिरी स्थित निसर्गयात्री संस्था आणि पुण्यातील दृश्यम कम्युनिकेशन्स यांनी केली आहे. या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन श्री राहुल नरवणे यांनी केले असून लेखन आणि निवेदन रत्नागिरीची सुकन्या सायली खेडेकर यांनी केले आहे. सिनेमॅटोग्राफर सतीश शेंगाळे, दत्ता मानकर, एडिटर मदन काळे, सत्यम अवधूतवार, मयुरेश कायंदे, म्युझिकसाठी ओंकार रापतवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ही शॉर्ट फिल्म कोकणातील कातळशिल्प शोध संरक्षण आणि संवर्धन यावर आधारित आहे. कोकणातील कातळशिल्प ह्या विषयावरील सविस्तर माहितीपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे .
आमच्यासाठी तसेच कोकणासाठी निश्चितच आनंदाची गोष्ट आहे.
सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आणि टीम निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी
राहुल नरवणे, सायली खेडेकर आणि टीम दृष्यम कम्युनिकेशन्स, पुणे
https://youtu.be/VR6UniAKsBs