बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी चिपळूणमध्ये शेतकरी मेळावा

चिपळूण : बांबू संघातर्फे दि. 15 रोजी येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी 10 वा. शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बांबू संघ व कोकण फार्मर प्रोड्यूसर कंपनीतर्फे चर्चासत्र आयोजित करण्यात आले
आहे.
संपूर्ण राज्यात बांबू लागवड व विक्री व्यवस्था मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. जिल्ह्यात देखील या बाबत जनजागृती व्हावी, वरकस आणि माळ रानावर बांबू लागवड शक्य आहे. सह्याद्री खोर्‍यामध्ये बांबू लागवड पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक आहे. जिल्ह्यात मानवेल, माणगा, कळक, चिवा, बोरबेट, कुल्डा आदी बांबूच्या प्रजाती अस्तित्त्वात आहेत. त्याचा उपयोग स्थानिक पातळीवर केला जातो. मात्र, बांबू शेतीची सरकार दरबारी नोंद नाही. त्यामुळे चिपळूण बांबू संघाने किती क्षेत्रावर बांबू लागवड आहे, बेटांची संख्या किती आहे याची लेखी माहिती मागवली आहे. ही माहिती ग्रामकौशल्य, खेराडे कॉम्प्‍लेक्स, चिपळूण येथे मिलिंद जोगळेकर यांच्याकडे पाठवावी व चिपळूण पं. स.मध्ये होणार्‍या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक बापू काणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button