
कंपनीकडून सदोष वाहन विक्री, ग्राहकाला लाखाची भरपाई देण्याचे आदेश
दोष असलेले वाहन ग्राहकाला देवून त्याला त्रासात टाकले, अशा स्वरूपाची तक्रार रत्नागिरीच्या ग्राहक आयोगात दाखल झाली. मंचाने सुनावणीनंतर ग्राहक आयोगाने तक्रार अर्ज अंशतः मंजूर केला. मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी १ लाख रू. एवढी रक्कम वाहन विक्री करणार्या कंपनीने द्यावी, असे आदेश देण्यात आले.काळकाई कोंड, दापोली येथील देवचंद शंकर जाधव यांनी एस. एस. मिरजे आणि कंपनी तसेच व्ही. ई. कमर्शिअल व्हेईकल यांच्या विरूद्ध रत्नागिरी येथील ग्राहक आयोगासमोर तक्रार दाखलल केली. ही तक्रार मंचाचे अध्यक्ष अरूण गायकवाड, सदस्य स्वप्नील मेढे, सदस्या अमृता भोसले यांच्यासमोर सुनावणीस आली. देवचंद जाधव हे रत्नागिरी जिल्ह्याचे रहिवासी असून व्हीई कमर्शिअल व्हेईकल्स ही कंपनी आयशर मॉडेलचे विक्रेते आहेत. मिरजे हे कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे आयशर मॉडेलचे अधिकृत डिलर आहेत. देवचंद जाधव यांनी आयशर ३०१६ हे चारचाकी वाहन २१,८३,००० रू. किंमतीला विकत घेतले. या वाहनाच्या वापराच्यावेळी अनेक अडचणी निर्माण झाया. हे वाहन चुकीच्या पद्धतीने चालवले व हाताळले. वाहनाची योग्य निगा राखली नाही, असे कंपनीने म्हटले. याशिवाय वाहनातील गियर बॉक्स बॅटरी, स्टेअरिंग पाईप १ ते २ वर्षामध्ये बदून द्यावे लागले. उत्पादित वाहनात दोष होता हे सिद्ध झाल्याचा निष्कर्ष ग्राहक आयोगाने काढला. www.konkantoday.com