सह्याद्री खोऱ्यात काही संस्थां व व्यक्तींकडून अनधिकृत कॅमेरे संशयित व्यक्तींना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार, वनविभागाने लक्ष घातले
सह्याद्रीच्या खोऱ्यात अनधिकृत कॅमेरे बसवून जंगलात भ्रमंती करणाऱ्यांवर वॉच ठेवला जात आहे. संशयास्पद आढळणाऱ्या व्यक्तींचे व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकारही सुरू झाला आहे.याबाबत वनविभागाने कठोर पावले उचलली असून ब्लॅकमेलिंग करणाऱ्याची तक्रार करा, आम्ही अशा व्यक्ती आणि संस्थांवर कारवाई करू, अशी माहिती वनविभागाच्या परिक्षेत्र वनाधिकारी राजेश्री कीर यांनी दिली. कोयनेच्या घनदाट जंगलातील अनेक वन्यप्राणी भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात कुंभार्ली घाट आणि डोंगरभागात फिरत असतात. घाटातील कासारखडक आणि इतर भागातील वन्यप्राण्यांच्या वाटा आणि पानवठे असलेल्या परिसरात काही संस्था आणि व्यक्तींनी अनधिकृतपणे कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेर्याद्वारे वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपल्या जातात.
त्या शिवाय जंगलामध्ये भ्रमंती करणाऱ्या नागरिकांच्याही हालचाली टिपल्या जातात. जे लोक संशयास्पदरित्या आढळतील त्यांचे व्हिडिओ तयार करून त्यांच्याकडे थेट संस्थेसाठी देणगीची मागणी केली जाते. देणगी न दिल्यास तुमचे व्हिडिओ वनविभाग आणि पोलिसांना देऊन तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडू, अशी धमकी दिली जाते. आदिवासी बांधवांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांना लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवून त्यांची सहानुभूती मिळवायची आणि दुसरीकडे जंगलात भ्रमंती करणाऱ्या किंवा संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तीचे व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार काहीजण करत आहेत.
www.konkantoday.com