
रत्नागिरीतालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा परिसरात ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला
रत्नागिरीतालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा परिसरात १०० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. १० ते १४ मे या कालावधीत याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता अन्य सर्व सेवा बंद ठेवल्या जाणार आहेत. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com