चिपळुणातील शिव नदीतून काढला प्लास्टिकचा ढीग
चिपळूण : शहरातील शिव नदीपात्रात टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच नगर पालिकेच्या कर्मचार्यांनी हटवला. नागरी वस्तीमधील काही रहिवासी देखील बेजबाबदारपणे मोकळ्या जागी घरगुती कचरा फेकून देऊ लागले आहेत. घंटागाडी सुविधेचा वापर रहिवाशांकडून होत नाही. परिणामी, शहरात न.प. मालकीच्या जागांसह अन्य मोकळ्या जागांवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कमी असलेल्या कर्मचार्यांवर ताण येत आहे. बेजबाबदार नागरिकांकडून गटारे, पर्हे, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळे अशा नागरिकांवर आता प्रशासनाने कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.