सौरभ मलुष्टे यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ओजस जोशी, ओम कोतवडेकर ठरले सायकलचे मानकरी
रत्नागिरी : सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा शनिवारी घेण्यात आली होती. या स्पर्धेला रत्नागिरी शहरातील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. पहिल्या दोन गटातील प्रथम क्रमांकासाठी सायकल बक्षीस ठेवण्यात आले होते. ओजस जोशी व ओम कोतवडेकर हे दोघे या सायकलचे मानकरी ठरले.
बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक रवींद्र सामंत, उद्योजक किरण सामंत, शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, बिपीन बंदरकर, विकास पाटील, निमेश नायर, महेश म्हाप, शिल्पा सुर्वे, पूजा पवार, दीपक पवार, उद्योजक प्रवीण मुलुष्टे, राजन शेट्ये, विरेंद्र वणजू, व्यापारी संघटनेचे गणेश भिंगार्डे, निखिल देसाई आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
छोटा गट : पहिली ते तिसरी निकाल : प्रथम क्रमांक-ओजस जोशी-दामले विद्यालय, व्दितीय क्रमांक आराध्या कांबळे-फाटक हायस्कूल, तृतीय क्रमांक : मृण्मयी आयरे-फाटक हायस्कूल, उत्तेजनार्थ आराध्या आयरे, गौरव कोळेकर, सात्विक नेवरेकर, केयुरी नागवेकर, आर्या रणधीर यांनी यश मिळवले.
मोठा गट : प्रथम क्रमांक ओम कोतवडेकर- शिर्के प्रशाला, व्दितीय आर्वती कारेकर-दामले विद्यालय, तृतीय क्रमांक आयुब यादव-दामले विद्यालय, उत्तेजनार्थ स्वर्णिमा भगवे-पटवर्धन प्रशाला, आकांक्षा उलपे-जागुष्टे हायस्कूल, सागर परियार-दामले विद्यालय, अमोद जाधव-दामले विद्यालय, स्वराज भाटकर-कृ.चि.आगाशे विद्यामंदिर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. व्दितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना रोख रक्कम पारितोषिक देण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.