या गावात देवाची नव्हे, पिराची नव्हे. तर गांधी बाबाची यात्रा भरते
महात्मा गांधी यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन अनेक जणांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. आजही महात्मा गांधीचे जीवन विषयक विचार मार्गदर्शक आहेत. अहिंसा विचाराने समाज जेव्हा मार्गक्रमण करतो, त्यावेळेस आपण गांधी विचारांमुळं स्वतःला नवीन रूपात पाहात असतो. यातून मग मानवता,सर्वधर्मसमभाव सारखे विचार पुढे येत असतात. गांधीजींचे हेच विचार 70 वर्षापूर्वी ग्रामीण भारतात किती खोलवर रुजले होते याची प्रचिती देणारे गाव म्हणजे ‘उजेड’.
लातूर जिल्ह्यातील एक गाव “उजेड”. ज्या गावात गांधी विचारांचा उजेड, सर्वधर्मसमभावाचा उजेड, गावातील भांडण सामोपचाराने मिटवण्याचा उजेड आहे. ज्या गावात देवाची नव्हे, पिराची नव्हे. तर गांधी बाबाची यात्रा भरते.लातूर जिल्ह्यातील एक गाव “उजेड”. ज्या गावात गांधी विचारांचा उजेड, सर्वधर्मसमभावाचा उजेड, गावातील भांडण सामोपचाराने मिटवण्याचा उजेड आहे. ज्या गावात देवाची नव्हे, पिराची नव्हे. तर गांधी बाबाची यात्रा भरते.
1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधींच्या विचारावर विश्वास ठेवून अनेकांनी स्वातंत्र्यलढ्याच्या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. त्यात सर्वांचा विजय झाला होता. मात्र मराठवाड्यावर निजामांचे वर्चस्व होते. एक वर्ष उशिराने निजाम स्टेट भारतात विलीन झालं. अशा या निजाम स्टेटमधील उजेडमध्येही महात्मा गांधीचे विचार पोहोचले होते.
गावामध्ये पिराची यात्रा भरवायची की महादेवाची यात्रा भरवायची यावरून वाद निर्माण होऊ लागले. गावातील काही सुजाण नागरिकांनी एकत्र आले आणि आपण गांधीबाबाची यात्रा सुरू करू असा प्रस्ताव ठेवला. गावातील सर्व समाजातील लोकांनी एकमुखाने या निर्णयाला मान्यता दिली. दिवस ठरला 26 जानेवारी. महात्मा गांधीचा पुतळा बनवून आणण्यात आला. गावच्या मुख्य चौकात तो पुतळा लावण्यात आला. रंगरंगोटी,पताका,संपूर्ण गावात रांगोळी काढण्यात आली होती. ग्रामदेवतेच्या यात्रेसारखी संपूर्ण तयारी
करण्यात आली होती. गांधीबाबाच्या यात्रेमध्ये मुख्य आकर्षण असतं ते राष्ट्रगीताचं. 26 जानेवारीला सकाळी गांधी चौकातील गांधी बाबाच्या पुतळ्यासमोर सर्वजण एकत्र येतात. राष्ट्रध्वजाची मिरवणूक काढली जाते. या यात्रेत आरती ऐवजी राष्ट्रगीत गायले जाते. महात्मा गांधींना अपेक्षित असणार खेडेगाव उजेडमध्ये पाहायला मिळतो.
www.konkantoday.com