पोलिस असल्याची बतावणी करीत चोरली रोकड
रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसी येथे पोलिस असल्याची बतावणी करुन स्नॅक सेन्टरच्या गल्ल्यातील 4 हजाराची रोख रक्कम चोरणार्या दोन संशयितांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शाहिद सादीक मुजावर (वय 32, रा. धनजीनाका, बेलबाग, रत्नागिरी) व फुरकान यासिन फणसोपकर (30, रा. कोकणनगर, रत्नागिरी) अशी संशयिताची नावे आहेत. ही घटना बुधवार 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वा.सुमारास मिरजोळे एमआयडीसी येथील राहुल स्नॅक सेन्टर येथे घडली होती. या प्रकरणी खुशबू बघेल हिने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला. तपासात पोलिसांनी संशयितांना शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून रोख रकमेसह एकूण 26 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.