नाशिकचे कलाकार अनंत खैरनार यांनी 100 ग्रॅम कापसाचा वापर करून 11 इंच उंचीची राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची अनोखी कलाकृती साकारली

0
347

साधारणतः धातू, काळा पाषाण, लाकूड किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस या सारख्या साधनांपासून तयार केलेले अनेक शिल्प पाहायला मिळतात.मात्र नाशिकचे कलाकार अनंत खैरनार यांनी 100 ग्रॅम कापसाचा वापर करून 11 इंच उंचीची राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची अनोखी कलाकृती साकारली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी शिल्पकलेतून अनोखी आदरांजली अर्पण केली आहे

खैरनार यांनी यापूर्वी प्रभू श्रीरामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, संत नामदेव, स्वामी विवेकानंद, मदर तेरेसा यांच्यासह अनेक देवी देवता आणि राष्ट्रपुरुषांच्या शिल्पकृती साकारल्या आहेत. त्यांनी तयार केलेल्या शिल्पकृती 30 देशांमध्ये पोहोचल्या आहेत. मात्र, महात्मा गांधी यांचे कापूस शिल्प साकारताना वेगळी अनुभूती आल्याचे ते सांगतात.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here