पोलिसांची दिशाभूल करत असल्याने भूषण खेडेकरच्या पोलिस कोठडीत आणखी 2 दिवसांची वाढ; इतर दोघांना न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी : सोने – चांदीच्या व्यापार्‍याचा गळा आवळून खून करणार्‍या तीन संशयितांपैकी भूषण सुभाष खेडेकर (वय 42, रा. खालची आळी, रत्नागिरी) याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने शनिवारी पुन्हा 2 दिवसांची वाढ केली. भूषण हा पोलिसांची सतत दिशाभूल करत आहे. व्यापारी कीर्तीकुमार कोठारी (वय 55, रा.भाईंदर मुंबई) यांचा खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील त्याचे साथीदार महेश मंगलप्रसाद चौगुले (39, रा. मांडवी सदानंदवाडी, रत्नागिरी) आणि फरीद महामुद होडेकर (36, रा. भाट्ये, रत्नागिरी) या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शनिवारी संशयितांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. तिघांनीही गुन्ह्याच्या दिवशी रात्री 8.33 आणि 12 वाजण्याच्या सुमारास असे दोनवेळा आपले कपडे बदलले. यात भूषणने गुन्हा करताना जी हाफ पॅन्ट परिधान केलेली होती ती सिसिटीव्हीत स्पष्ट दिसत असून ती पॅन्ट पोलिसांना देण्यास तो टाळाटाळ करत आहे. त्याऐवजी दुसरीच हाफ पॅन्ट पोलिसांना देऊन दिशाभूल करत असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. त्यामुळे भूषणच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करून इतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button