जाकीमिर्या येथे वीज कोसळून नुकसान
रत्नागिरी : शुक्रवारी सायंकाळी शहरानजीकच्या जाकीमिर्या येथे वीज कोसळून चार घरातील विजेची उपकरणे जळाली तर शौचालयासह इमारतीचेही नुकसान झाले आहे. रत्नागिरीत दुपारनंतर पडलेल्या या पावसाने दाणादाण उडाली. वीज कोसळण्याची घटना घडली, त्यावेळी आनंदनगर येथील प्रभाकर जाधव यांच्यासह राजू जाधव, प्रिया जाधव, सुजाता जाधव यांच्या घरातील वीज उपकरणांचे नुकसान झाले. घरातील वीज इर्न्व्हटर, फ्रिज आदी उपकरणे जळून नुकसान झालेले आहे. तसेच घराशेजारच्या शौचालयावर वीज पडल्याने नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.