रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटील यांची नांदेड वाघाला महानगर पालिकेवर आयुक्त म्हणून बदली देवेंद्र सिंग रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी
शासनाने काल रात्री उशीरा राज्यातील ४४वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी एन पाटील यांची नांदेड येथे बदली झाली आहे
शिंदे फडणवीस सरकारने गुरुवारी रात्री उशिरा तब्बल 44 सनदी अधिकाऱयांच्या घाऊक बदल्या केल्या. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची नियुक्ती राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे.मराठी भाषा विभागाचा अतिरिक्त भारही त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास यांची बदली आदिवासी विभाग अपर मुख्य सचिव या पदावर करण्यात आली आहे. एमएसईबीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांची नियुक्ती सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव म्हणून तर गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती राज्य उत्पादन शुल्क व विमान चालन प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची नियुक्ती ठाणे महापालिका आयुक्त पदावर करण्यात आली आहे. तर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांची बदली वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनकरण्यात आली आहे. असंघटित कामगार विकास आयुक्त अश्विनी जोशी यांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग सचिव म्हणून करण्यात आली आहे. संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आदिवासी विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची नियुक्ती अल्पसंख्याक विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक ए. आर. काळे यांची नियुक्ती अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची नियुक्ती महासंचालक माहिती व जनसंपर्क संचालनालय या पदावर करण्यात आली आहे. उद्योग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती उद्योग ऊर्जा व कामगार विभाग प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांची नियुक्ती आदिवासी विभाग अतिरिक्त आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडे यांची नियुक्ती पर्यावरण विभागाचे सचिव तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे.
लीना बनसोड आदिवासी विभागाच्या अतिरिक्त आयुक्त, विवेक जॉन्सन चंद्रपूर जिल्हा परिषद सीईओ, अभिजीत राऊत नांदेड जिल्हाधिकारी, रामस्वामी कौशल्य विकास आयुक्त नवी मुंबई, परिमल सिंग प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनीप्रकल्प, विपिन शर्मा एमआयडीसी सीईओ, सौरभ विजय सांस्कृतिक व पर्यावरण विभाग सचिव, मिलिंद बोरीकर मुंबई गृहनिर्माण महामंडळ मुख्याधिकारी, अविनाश ढाकणे एम एस फिल्म सांस्कृतिक विकास व्यवस्थापकीय संचालक, अनबलगन पी. यांची महाजेनको अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, दीपक कपूर जलसंपदा अतिरिक्त मुख्य सचिव, वलसा नायर गृहनिर्माण विभाग प्रधान सचिव मंत्रालय, तुकाराम मुंढे आयुक्त आणि संचालक एन एच एम, दिपेंद्र सिंग कुशवाह उद्योग विकास आयुक्त, अशोक शिंगारे ठाणे जिल्हाधिकारी, श्रद्धा जोशी राज्य पर्यटन विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक, मनोज जिंदाल ठाणे जिल्हा परिषद सीईओ, कीर्ती पुजार सिओ रत्नागिरी जिल्हा परिषद, कौस्तुभ दिवेगावकर प्रकल्प अधिकारी बाळासाहेब ठाकरे कृषी उद्योग आणि ग्रामीण विकास प्रकल्प पुणे, राजेंद्र निंबाळकर व्यवस्थापकीय संचालक एम.एस.एस.आय.डी.सी., विवेक भिमानवार राज्य परिवहन आयुक्त, देवेंद्र सिंग यांची नियुक्ती रत्नागिरी जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
www.konkantoday.com