मुंबई गोवा महामार्गावर सावर्डे येथे मारुती कार खोल भागात कोसळून झालेल्या अपघातात महिला वैद्यकीय अधिकारी जखमी

मुंबई गोवा महामार्गावर सावर्डे पासून जवळ असलेल्या आगवे येथे मारुती अल्टो आणि टू व्हीलर यांच्यात झालेल्या अपघातानंतर मारुती कार रस्ता सोडून खोल भागात कोसळल्याने या अपघातात शासकीय रुग्णालयातील मानसोपचारतज्ञ डॉक्टर समीक्षा जाधव या गंभीर जखमी झाल्या तसेच टू व्हीलर चालकही जखमी झाला आहे डॉक्टर समीक्षा जाधव या आपल्या पतीसह चिपळूण येथे कॅम्पसाठी जात असताना त्यावेळी त्यांच्या गाडीला समोरून येणाऱ्या दुचाकीची धडक झाली दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी रस्ता सोडून खोल दरीत कोसळल्याने जाधव या गंभीर जखमी झाल्या
त्यांना डेरवण येथे अधिक उपचारासाठी तातडीने नेण्यात आले मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा ढिसाळ कारभार. आगवे येथे महामार्ग खचल्यामुळे वाहन चालकांना कसरत.करावी लागत आहे चौपदरीकरणाचा ठेकेदार चार महिने होऊन सुद्धा दुर्लक्ष करीत आहे. परिणामी वाहन चालकांना आज अपघाताला सामोरे जावे लागले. अपघात स्थळी सावर्डे पोलीस दाखल तसेच आगवे येथील सह्याद्री युवा मंच आगवे चे सदस्य प्रसाद तिरुपनकर, विकास भंडारी, सुमित भंडारी, चिरंजीव भंडारी, धीरज भंडारी, सतीश निमुनकर, संकेत भंडारी, इत्यादी सर्वांनी पोलिसांच्या मदतीने व कालिकादेवी बचत गट रुग्णवाहिका यांच्या मदतीने जखमींना इस्पितळात पोहोचवले. घडल्यानंतर सह्याद्री युवा मंच सदस्यानी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्यास मदत केली या अपघातात दुचाकी जखमी झाला असून डॉ जाधव यांचे पती यांना किरकोळ मार लागला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button