
देवीला अर्पण केला सोन्याचा हार
देवरूख : नजीकच्या साडवली सह्याद्रीनगर मित्रमंडळाचा नवरात्र उत्सव घटस्थापनेपासून सुरू झाला. भव्य मिरवणुकीने देवीची मूर्ती आणली गेली व विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. याच दिनी जि. प. सदस्य रोहन बने यांनी देवीचा नवस फेडताना सोन्याचा हार देवीला अर्पण केला. पहिल्याच दिवशी शेकडो भाविकांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. सोमवारी दुपारी माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, सौ. समिक्षा बने व माजी जि.प.सदस्य सुरेश बने यांनी नवसपूर्ती करताना देवीला 51 ग्रॅमचा सोन्याचा हार अर्पण केला. मंडळाचे अध्यक्ष सुखदेव जाधव, सौ. संगिता जाधव व मंडळाचे कार्यकर्ते यांच्या मेहनतीतून उत्सव रंगत आहे.