
उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीत सहानुभूती दिसली नाही-माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण.
उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीत सहानुभूती दिसली नसल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर महाविकासआघाडीमध्ये पुन्हा धुसफूस वाढणार का?अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. ‘सहानुभूती असती तर त्यांच्या कामगिरीमध्ये ती दिसली असती, पण त्यांची कामगिरी म्हणावी तितकी चांगली झाली नाही. सहानुभूती असती तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात ज्या थेट लढती झाल्या तिथेही एकनाथ शिंदे यांचा निर्णायक पराभव झाला नाही’, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या मेळाव्यात शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांसमोरच विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करा, अशी मागणी केली होती. तसंच ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र मान्य नसल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री या फॉर्म्युलामध्ये मित्रपक्षांमध्येच पाडापाडी होते, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. एकीकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मागत असतानाच पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र महाविकासआघाडी हा चेहरा असल्याचं सूचक विधान केलं आहे.