सिधुदुर्ग जिह्याच्या समुद्रात पहिल्यांदाच दुर्मिळ ओशियन सनफिश सापडला

सिधुदुर्ग जिह्याच्या समुद्रात पहिल्यांदाच दुर्मिळ ओशियन सनफिश सापडला आहे. मालवण येथील मच्छीमारांना हा दुर्मिळ मासा सापडला आहे. हा मासा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.मच्छीमार मासेमारी करत असताना मालवणमधील दांडी आवार येथील पीटर मेंडीस यांच्या ‘होली क्वीन’ या नौकेला हा ओशियन सनफिश हा दुर्मिळ मासा सापडला. सनफिश माशाचे शास्त्र्ााrय नाव ‘मोला मोला’ असे असून हा मासा सर्वभक्षीय आहे. हा मासा उष्णकटिबंधातील समुद्रात आढळत असून समुद्राच्या पाण्यात ते सतत पृष्ठभागावर सन बाथ घेतल्याप्रमाणे सारखे वर येत असतात म्हणून त्यांचे नाव सनफिश पडले आहे.

या माशाचा आकार 11 फुटांपर्यंत असून वजन 2.5 टनापर्यंत असते. सनफिश किंवा मोला मोला माशांचा पाठचा भाग छाटलेला वाटतो, त्यांचा आकार ते बुलेटसारखा दिसतो, त्यांचे पाठीमागील पंख जन्मतः असतात, परंतु ते कधीच वाढतच नाहीत. त्याऐवजी तो परिपक्व होताना पंख स्वतःमध्ये दुमडतो. एक गोलाकार रडार तयार करतो ज्याला क्लॅव्हस म्हणतात. महासागरातील सनफिश त्यांच्या काहीशा गोलाकार आकाराने वेगळे दिसतात. त्यांचा रंग चंदेरी असून त्वचा खडबडीत असते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button