
तुरंबव, टेरव दर्शनासाठी चिपळूण आगाराच्या विशेष फेर्या
चिपळूण : नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने चिपळूण एसटी आगारातून देवी दर्शनासाठी विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तुरंबव, टेरव या ठिकाणी या गाड्या सोडण्यात येणार आहेत. तुरंबव येथील श्री शारदादेवीच्या दर्शनासाठी ज्यादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. दररोज सकाळी 6:45 वा. चिपळूण-पुर्ये, 7:45 वा. वाडदेवाडी, 11:45 वा. तुरंबव मार्गे तोंडली, 3:45 वा. तोंडली, 3:30 वा. वीरबंदर, रात्री 8 वा., 10 वा. चिपळूण-तुरंबव, 1:45 वा., 5:45 वा., 8:30 वा. चिपळूण-तुरंबव गाडी सोडण्यात येणार
आहे.
तसेच टेरव येथील भवानी देवी दर्शनासाठी पहाटे 5:45, 8:30, 11:30, दुपारी 1, 1:30 वा.,3:00 व सायंकाळी 5:30 वा. गाडी सोडण्यात येणार आहे. यावर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने भाविकांच्या दर्शनाची एसटी आगाराने सोय केली आहे.