रत्नागिरी शहरात भरवस्तीत जयस्तंभ समोर कार्यालयात शिरला भलामोठा अजगर
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ समोरील अॅडव्होकेट समृद्धी मयेकर यांच्या कार्यालयात सकाळी वर्दळीच्या वेळी अजगराने प्रवेश केला त्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली
सकाळी दहा साडेदहा वाजण्याच्या सुमाराला वर्दळीच्या वेळी कार्यालय उघडल्यानंतर अचानक अजगराने प्रवेश केला त्यामुळे कर्मचार्यांची तारांबळ उडाली त्यानंतर तातडीने सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले सर्पमित्र सुकांत पाडाळकर यांनी या अजगराला पकडण्याचा प्रयत्न केला अजगराने लोखंडी ग्रीलला विळखा घातल्याने पकडणे कठीण जात होते सर्पमित्र सुकांत पाडाळकर यांनी अजगराचे तोंड पोत्यात घालण्यात यश मिळवले तो पर्यंत अजगराला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली त्यातील अनेक जण पाडाळकर यांच्या मदतीला धावले शेवटी काही लोकांच्या मदतीने अजगराला पोत्यात भरण्यात यश मिळाले मात्र अजगराला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमल्याने पोलिसांना ट्रॅफिक कंट्रोल करणे भाग पडले
www.konkantoday.com
पहा व्हिडिओ….👇