रत्नागिरी आठवडा बाजारातील दुकान फोडणार्‍यांना पोलिस कोठडी; बालकाची रवानगी सुधारगृहात

रत्नागिरी : शहरात दुकान फोडणार्‍या तिघांना सोमवारी न्यायालयाने 1 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. चौथा संशयित विधी संघर्षित बालक असल्याने त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले. आठवडा बाजार येथील यश ट्रेडर्स हे दुकान फोडून रोख 32 हजार रुपये लांबवले होते. त्यांच्या मुसक्या पोलिसांनी गोव्यातून आवळल्या होत्या. फिरोज इसरार आलम (वय 48,रा. उत्‍तरप्रदेश), मोहम्मद सुफियान मोहम्मद अब्बास (वय 27, रा.कानपूर उत्‍तरप्रदेश), मोहम्मद अझरुद्दीन मोहम्मद हनीफ (वय 22, रा. कासीमनगर उत्‍तरप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. निर्मल रमेश ओसवाल (वय 33, रा. आठवडा बाजार, रत्नागिरी) यांच्या दुकानातील रोख 32 हजार रुपये चोरुन नेले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button