ऍड. चंद्रप्रकाश नकाशे थेट आराखड्यात

शिवसेनेत दुर्मिणतेने दिसणारी उघडणपणे जाहीर भूमिका घेत उबाठा शिवसेनेचे लांजा-राजापूर-संगमेश्‍वर विधानसभा क्षेत्रप्रमुख ऍड. चंद्रप्रकाश नकाशे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपण इच्छूक असल्याचे मत व्यक्त केले आहे. यामुळे शिवसेनेंतर्गत मोठी हलचल होण्याची शक्यता आहे.केवळ आदेशावर चालणारे संघटना म्हणून रूबाबाने ओळख सांगितली जात असलेल्या शिवसेनेत आता लोकशाही अथवा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावनांना काही किंमत आहे की नाही की फक्त आदेशामुळे बाकीच्यांनी शदकोंदशके आदेश पाळण्यात जीवनाचे सार्थक करावे, असा प्रश्‍न दर निवडणुकीच्या वेळी अंतर्गत स्तरावर काही वर्षापासुन उफाळून येत असतो. मात्र आता दशकोंदशके शिवसेना संघटनसाठी खस्ता खाल्लेल्या शिवसैनिक तसेच पदाधिकार्‍यांच्या भावनादेखील आता उफाळून येताना दिसत असून त्या खुलेआमपणे व्यक्त होवू लागल्या आहेत. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी राजापूर-लांजा मतदार संघात शिवसेना पक्षाच्या वतीने आपण इच्छूक असून पक्षाने माझ्या उमेदवारीचा योग्य तो विचार करावा, अशी उघड मागणी उबाठा शिवसेनेचे लांजा-राजापूर-संगमेश्‍वर विधानसभा क्षेत्रप्रमुख ऍड. चंद्रप्रकाश नकाशे यांनी केली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button