आजारपणाला कंटाळून दापोलीत वृद्धेने पेटवून घेतले
दापोली : तालुक्यामधील शिवाजीनगर येथे राहणारी प्रभावती खानविलकर या 87 वर्षीय वृद्धेने आजारपणाला कंटाळून स्वतःला पेटवून आत्महत्या केली.
ही घटना सोमवार दि. 26 सप्टेंबर रोजी रात्री 1:15 च्या दरम्यान घडली. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभावती खानविलकर या सतत आजारी होत्या. आजारपणाला कंटाळून रात्रीच्या सुमारास त्यांनी स्वतःला पेटवून घेतले.
भाजलेल्या अवस्थेत त्यांचा मुलगा सुरेश खानविलकर याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे उपचाराकरिता दाखल केले. उपचार सुरू असताना सोमवार 26 सप्टेंबर रोजी पहाटे 4:45 च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस नाईक नलावडे करीत आहेत.