
आंबोली घाटाच्या दरीत उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या नवविवाहितेला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले
आंबोली घाटाच्या दरीत उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या त्या नवविवाहितेला बुधवारी गोवा बांबोळी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. शिरोडा येथे शिक्षक असलेल्या पतीसोबत झालेल्या भांडणातून तिने हा प्रकार केला होता. कमल रामनाथ इदे ( २४, रा. आकोले अहमदनगर ) असे तिचे नाव असुन ती मानसिक दडपणाखाली असल्याची माहीती तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरिक्षक तौसिफ सय्यद यांनी दिली.
कमल हिने आंबोली घाटात धबधब्याच्या परिसरात मंगळवारी दरीत उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.मात्र, ती त्यात बालंबाल बचावली होती. आंबोली येथील रेक्यु टीमच्या सहाय्याने पोलिसांना तिला दरीतून सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळाले होते. त्यानंतर तिच्यावर आंबोली प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचार करुन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते.
www.konkantoday.com