
गोविंदगड किल्ल्याकडे जाणार्या मार्गावरील पायर्यांच्या कामाचा घटस्थापनेला शुभारंभ
चिपळूण : आमदार शेखर निकम यांच्या निधीतून ऐतिहासिक असलेल्या गोविंदगड किल्ल्याकडे जाणार्या मार्गावरील पायर्यांच्या कामाचा शुभारंभ सोमवार दि. 26 रोजी दुपारी 12 वा. होणार आहे. या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देवी करंजेश्वरी व श्री देव सोमेश्वर देवस्थानच्यावतीने अध्यक्ष अॅड. प्रसाद चिपळूणकर यांनी केले आहे. नवरात्रौत्सवाच्या प्रारंभी म्हणजेच घटस्थापनेला श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी मंदिराजवळून गोविंदगडाकडे जाणार्या मार्गावर पायर्या करण्याबाबत आ. निकम यांनी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून गडाच्या पायथ्याशी असलेल्या जागृत श्री देवी करंजेश्वरी मंदिर देवस्थान ते गोविंदगडावर जाणार्या मार्गावर पायर्या करण्यात येणार आहेत. गडावर ग्रामदैवत रेडजाईचे मंदिर आहे. करंजेश्वरी मंदिर ते गोविंदगड मार्गावरील पायर्यांच्या कामाचा शुभारंभ आ. निकम यांच्या हस्ते सोमवारी सकाळी 12 वा. होणार आहे. यावेळी माजी आ. रमेश कदम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहर अध्यक्ष मिलिंद कापडी यांच्यासह गोवळकोट, पेठमाप, मजरेकाशी परिसरातील ग्रामस्थ व प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चिपळूणकर, सदस्य तसेच राजे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल राऊत यांनी केले आहे.