
सेंद्रीय आंबा विक्रीसाठी आत्मांतर्गत स्टॉल
कृषी विभागाच्या आत्मांतर्गत सेंद्रीय शेती करणारे ३३ शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहेत. त्या गटांमधील शेतकर्यांनी तयार केलेल्या मालाची कंपन्यांकडून खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकर्यांना मालाचा चांगला दर मिळत आहे. यंदा सेंद्रीय पद्धतीने तयार केलेल्या आंब्याची विक्री करण्यासाठी सातारा, कराड, बारामतीसह अन्य मोठ्या शहरांमधून स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कृषि विभागाकडून पर्यावरणपूरक सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले जात आहे. यासाठी आत्मा अंतर्गत शेतकरी गट तयार करण्यात आले आहेत.
www.konkantoday.com