रेल्वेखाली झोकून देत टिके येथील तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी : शहरानजीकच्या आरटीओ रेल्वे पुलावर ट्रेनपुढे स्वतःला झोकून देत तरूणाने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 4 च्या सुमारास घडली. प्रणव कृष्णा सनगरे (वय 24, रा. टिके भातडेवाडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी प्रणव हा आरटीओ रेल्वे पुलावर गेला होता. यावेळी प्रणव याने कोच्चिवली-भावनगर एक्सप्रेस गाडीसमोर स्वतःला झोकून दिले. रेल्वेच्या धडकेत प्रणव याचा जागीच मृत्यू झाला. कोकण रेल्वेचे ट्रॅकमन यांना सायंकाळी प्रणव याचा छिन्न-विछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. त्यानुसार त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. प्रणव याने नेमके कोणत्या कारणावरून आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.