मांजर आडवी आल्याने पत्नीचा अपघाती मृत्यू; पतीविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी : पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दुचाकी स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश अर्जून सावंत (वय 47, रा. आकाशवाणी पाठीमागे, गणेश पाटील यांच्याकडे भाड्याने, मुळ रा. बौद्धवाडी, पाली-रत्नागिरी ) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजणयाच्या सुमारास खेडशी ते आकाशवाणी च्या पाठीमागे जाणार्या रस्त्यावर घडली. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सावंत यांनी पत्नीच्या नावे असलेली दुचाकी क्र (एमएच-08 एई 8705) घेऊन पत्नीस मागे बसवून तिला हेल्मेट न घालता महालक्ष्मी मंदिर खेडशी ते आदीशक्ती नगर कारवांचीवाडी अशी चालवत जात असताना दुचाकी निष्काळपणे चालवून पुढे मांजर आडवे आल्याने मागे बसलेली त्यांची पत्नी अनामिका राजेश सावंत या खाली पडून गंभीर जखमी झाल्या. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस हवालदार विनोद भितळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दुचाकी वाहनाच्या विम्याची मुदत संपलेली आहे हे माहीत असताना देखील पत्नीच्या नावे असलेली दुचाकी चालवून अपघात केला. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.